The Statue of liberty new york America USA
स्वातंत्र देवतेचा पुतळा न्यूयार्क

जगात सर्वात प्रसिद्धी पावलेला पुतळा कोणता असेल तर अमेरिकेतील न्यूयार्क पासून 1.95k.m. लांब असलेला लिबर्टी आयलंड येथे उभारलेला स्वातंत्र देवतेचा पुतळा. (स्टेच्यू ऑफ लिबर्टी) जगात स्टेच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही उंच पुतळे झालेत, पण स्टेच्यू ऑफ लिबर्टी इतकी प्रसिद्धी कोणत्याही पुतळ्याला मिळालेली नाही.चीन मधिल जाओकुन कस्बे येथेल स्प्रिंग टैम्पल बुद्ध हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, याची उंची 420 फूट आहे, तर स्टेच्यू ऑफ लिबर्टीची उंची 305फूट1 इंच आहे. असे असले तरी आज स्टेच्यू ऑफ लिबर्टीला ज्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे ती स्प्रिंग टैम्पल बुद्धला किंवा अन्य कोणत्याही पुतळ्यास मिळालेली नाही. आता नुकतेच उदघाटन झालेल्या गुजरात मधील सरदार वल्ल्भभाई पटेल यांचे स्टेच्यू ऑफ यूनिटीची तुलना पण स्प्रिंग टेम्पल बुद्धशी न करता स्टेच्यू ऑफ लिबर्टीशी केली जाते, स्टेच्यू ऑफ यूनिटीची उंची 597फीट आहे. अमेरिकेला स्वातंत्र 4 जुलै 1776 रोजी मिळाले.अमेरिकेच्या100 व्या वर्षाच्या स्वातंत्र दिवसा निमित्त फ्रांस कडून मित्रत्वाचे प्रतीक म्हणून स्वातंत्र देवतेची मूर्ती भेट देण्यात आली. या पुतळ्याचे बरेचसे काम फ्रांस मध्ये व बाकीचे अमेरिकेत लिबर्टी आयलंड येथे पुतळ्याच्या जागेवर केले गेले या पुतळ्याचे उदघाटन 28 ऑक्टोबर 1886 रोजी झाले. हा स्वातंत्र देवतेचा पुतळा लिबर्टी आयलंड (1956 पूर्वी या आयलंड चे नाव Bedloe’s Island असे होते ) या अंडाकृती जागेवर आहे.स्वातंत्र देवतेचा पुतळाची उंची पायथ्या पासून हातातील मशाली पर्यंतची 305फूट1 इंच आहे. त्यापैकी तांब्याच्या पुतळ्याची उंची 151 फूट 1 इंच आहे. या स्वातंत्र देवतेच्या उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत असून दुसऱ्या हातात पुस्तक आहे व पुस्तकावर 4 जुलै 1776 (“July IV DCCLXXVI”) ही अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख लिहिलेली आहे.

हि स्वातंत्र देवता उभी असून पुतळ्याच्या मुगुटात ज्या 7 खिडक्या आहेत, त्या जगातील 7 खंडांचे प्रतीक दर्शवतात,उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते, तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते.या पुतळाच्या मुगुटापर्यंत जाण्यासाठी गोलाकार 354पायऱ्या आहेत, व पूर्व परवानगी शिवाय मुगुटा पर्यंत जाता येत नाही. स्वातंत्र देवतेचा पुतळा बनविण्यासाठी 9 वर्षाचा कालावधी लागला व यासाठी एकूण तांबे 27.22 मेट्रिक टन व लोखंड 113.4 मेट्रिक टन लागले.या स्वातंत्र देवतेचे तोंड हे दक्षिण दिशेला असून पश्चिम वायव्य दिशेला फेरी बोटीतून लोकांना उतरण्यासाठी ची सोय केलेली आहे. फेरीबोट न्यू जर्शी व न्यूयार्क दोन्ही बाजूंनी आहे एकाच तिकिटावर न्यू जर्शी व न्यूयार्क येथे जाता येते ह्या स्वातंत्र देवतेला पाहण्यासाठी रोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या 10 ते 20 हजाराच्या सुमारास आहे.पूर्वी युरोपातून बोटीने अमेरिकेत येणार्‍या लोकांना पहिले दर्शन हे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचे होत असे .या लिबर्टी आयलंडच्या जवळच्या आयलंड वर इमिग्रेशनची बिल्डिंग आहे तेथे प्रवाशी लोकांचे इमिग्रेशन झाल्यावरच अमेरिकेत प्रवेश मिळत असे आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.
#TravelinAmerica
#vilasdeshpande